Monday , September 21 2026
Breaking News

रमेश जारकीहोळी यांनी घेतली विजयेंद्र यांची भेट

Spread the love

 

बेंगलोर : बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पाहायला मिळत होते. विजयेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपद निवडीवरून बसवराज पाटील यतनाळ आणि रमेश जारकीहोळी नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र यांची भेट घेऊन त्यांना प्रदेशाध्यक्षपदी निवडीच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले, लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार आणायचे आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा विराजमान करावयाचे आहे. त्यामुळे सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. विजयेंद्र यांची आज भेट घेतली. त्यांनीही राज्यात सर्वांच्या सहकार्याने पक्षाला पुढे नेण्याचे ठरविले आहे, असेही जारकीहोळी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *