Sunday , September 20 2026
Breaking News

घरावर पत्रे घालताना खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

Spread the love

 

खानापूर : घरावर पत्रे घालताना तोल जाऊन खाली पडल्याने कौंदल येथील अनंत मारूती कुरूमकर (वय‌ 36) यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10-30 वाजता  घडली आहे..

याबाबत समजलेली माहिती अशी की, अनंत मारूती कुरूमकर यांचा फेब्रिकेशनचा व्यवसाय असून, ते एका घरावर फॅब्रिकेशनचे काम करत होते. त्यावेळी पत्रे चढवत असताना तोल जाऊन ते खाली पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते. पोलिसांनी जागेचा पंचनामा करून मृतदेह खानापूर प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्रात आणण्यात आला आहे. मृतदेहावर शल्य चिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून,  पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *