Saturday , March 2 2024
Breaking News

कोल्हापुरात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Spread the love

 

गोवा-मुंबई बस उलटली

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा (बस) भीषण अपघात झाला आहे. गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी येथे पोहोचली. प्रवासादरम्यान ही बस उलटली. ही बस एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याचं सांगितलं जात आहे.

ही स्लीपर कोच बस कोल्हापूर शहरालगत पुईखडी भागात राधानगरी रोडवर वळण घेताना उलटली. या अपघातात पुण्यातील तीन जण ठार झाले आहेत. या बसमध्ये जवळपास २५ प्रवासी होते. बस उलटल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. तर चार प्रवासी बसखाली अडकले होते, त्यांनादेखील बाहेर काढलं. या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर १६ प्रवाशी सुखरूप आहेत.

या अपघातात नीलू गौतम (४३), रिद्धिमा गौतम (१७) आणि सार्थक गौतम (१३) या तिघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान आणि मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी बचावकार्य पार पाडले.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापूरच्या सुपुत्री लीना नायर यांना ग्लोबल इंडियन पुरस्कार

Spread the love  मुंबई : कोल्हापूरच्या सुपुत्री फ्रान्समधील जगप्रसिद्ध शॅनेल या फॅशन जगतातील बड्या कंपनीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *