Monday , December 23 2024
Breaking News

सदलगा नगरपालिका पोटनिवडणूकीत चारही प्रभाग काँग्रेस समर्थक गटाकडे

Spread the love

 

नगरपालिकेवर काँग्रेसच्या सत्तेचे संकेत; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

सदलगा : चिकोडी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या सदलगा पोटनिवडणूकीत चारही प्रभागांवर काँग्रेस समर्थकांनी बाजी मारली. प्रतिष्ठेची ठरलेल्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये काँग्रेसचे उमेदवार बसवराज गुंडकल्ले यांनी १२६ मताधिक्य मिळवून महांतेश देसाई यांना पराभूत केले.
विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि चिक्कोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सदलगा नगरपालिकेची पोटनिवडणूक लढवून चारही प्रभागातील काँग्रेस समर्थक उमेदवार विजयी झाले, आता हुक्केरी पितापुत्र यांच्याच मार्गदर्शनाखाली लवकरच सत्ता स्थापून नगराध्यक्ष निवड करण्यात येईल असे प्रतिपादन बसवराज गुंडकल्ले यांनी केले. येऊ घातलेल्या जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय म्हणजे प्रकाश हुक्केरी, गणेश हुक्केरी यांच्या सद्दीची नांदी म्हणावी का असा सूर उमटत आहे. हुक्केरी पितापुत्रांच्या विकासकामांच्या जोरावर, मतदारांवर असलेल्या विश्वासाच्या बळावर आपल्या क्षेत्रात पकड घट्ट केली आहे.

प्रभागनिहाय मते खालीलप्रमाणे मते मिळविली…
प्र.क्र. ५  अताउल्लाह मुजावर (विजयी) ५१२ मते, मोहसीन सनदी (पराभूत) २०१ मते, हुसेन मकानदार (पराभूत) ६० मते,
प्र.क्र. १५ रिहाना सनदी (विजयी) ६०४ मते, करिष्मा मुजावर (पराभूत) १७० मते,
प्र. क्रं. १२ बसवराज गुंडकल्ले (विजयी) ३७९ मते, महांतेश देसाई (पराभूत) २५३ मते
प्र.क्र. १६ शकुंतला कुंभार (विजयी) ३९८ मते, रशिया जमादार (पराभूत) १८६ मते

भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या प्रभाग क्र. ५, १२,१५ आणि १६ च्या उमेदवारानी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षांतर बंदी अन्वये ही पोटनिवडणूक लागली होती. आता २० महिन्यांसाठी सदलगा नगरपालिकेवर सत्तांतर होऊन काँग्रेसच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदी विराजमान होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
वडिल दिवंगत आण्णासाहेब गुंडकल्ले यांच्या आशीर्वादाने तसेच हुक्केरी पितापुत्रांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या नगरसेवकांसह विरोधकांनाही सोबत घेऊन, विश्वासात घेऊन सदलग्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित उमेदवार बसवराज गुंडकल्ले यांनी केले.

चारही उमेदवारांनी चिकोडी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळून फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. सदलग्यात विजयी उमेदवारांची जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली, गुलालाची उधळण करत फटाके फोडून काँग्रेसचे झेंडे फडकवत आपला आनंद व्यक्त केला. विजयी उमेदवारांनी आपापल्या प्रभागात मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान केल्याप्रित्यर्थ आभार मानले.

चिक्कोडी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, सदलगा उपतहसिलदार पी. बी. शिलवंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी सुभाष बजंत्री, सुरेश पुजारी यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. सदलगा पीएसआय शिवकुमार बिरादार, चिकोडी पीएसआय बसवराज नेर्ली आणि सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About Belgaum Varta

Check Also

चिक्कोडीत दुचाकीचा भीषण अपघात : शिक्षक ठार

Spread the love  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एक संगीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *