Sunday , July 26 2026
Breaking News

चिक्कोडीत दुचाकीचा भीषण अपघात : शिक्षक ठार

Spread the love

 

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एक संगीत शिक्षक मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव दर्शन शहा असे आहे. दर्शन शहा हे चिकोडीतील केएलई संस्थेच्या सीबीएसई शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दुचाकी चालविताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तातडीने त्यांना चिक्कोडीच्या सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पीएसआय रूपा गूडोदगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यात विद्युत कंपनीच्या खाजगीकरणाविरोधात शेतकऱ्यांचा पाठिंबा

Spread the love  सदलगा : सदलगा येथे आज येथील समस्त शेतकऱ्यांनी एकत्रितपणे कर्नाटक राज्य विद्युत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *