Sunday , June 21 2026
Breaking News

सदलग्यात विद्युत कंपनीच्या खाजगीकरणाविरोधात शेतकऱ्यांचा पाठिंबा

Spread the love

 

सदलगा : सदलगा येथे आज येथील समस्त शेतकऱ्यांनी एकत्रितपणे कर्नाटक राज्य विद्युत कंपनीचे खाजगीकरण करुन टाटा पॉवर सारख्या खाजगी कंपनीना विद्युत पुरवठा करण्याची परवानगी देऊन खाजगीकरण करण्याचा सरकारने घाट घातला असून त्याला २३ जून पूर्वी आक्षेप असल्यास नोंदवावा लागणार, अशा प्रकारे खाजगीकरण करुन समस्त शेतकऱ्यांची, नोकरवर्गाची, व्यावसायिकांची  गैरसोय करत आर्थिक संकटात ढकलण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात आज विविध संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत संघटना अशा एकत्रितपणे सुमारे पाच सातशे शेतकऱ्यांनी, हेस्कॉमचे अधिकारी, कर्मचारी मोर्चाने उपतहसीलदार कार्यालयाकडे घोषणाबाजी करत उपतहसिलदार पी बी शिरिवंत, महसूल अधिकारी एम ए नागराळे यांना निवेदन दिले.

उपतहसीलदार शिरिवंत यांना विद्युत कंपनी खाजगीकरण विरोधात शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याचे निवेदन, हेस्कॉम कर्मचाऱ्यांचे विद्युत कंपनी खाजगीकरण विरोधातील निवेदन अशी दोन्ही निवेदने स्वीकारुन वरिष्ठांच्यापर्यंत आजच ई-मेलद्वारे तसेच स्पीडपोस्टद्वारे पाठवत असल्याची ग्वाही दिली.

यावेळी कार्यकारी अभियंता सुप्रभा बंडगार, सहाय्यक अभियंता बसवराज पुजेरी, सहाय्यक अभियंता सुरेश तहसीलदार यांनी खासगीकरणाचे लाभांपेक्षा तोटे किती गंभीर असल्याचे आणि या तोट्यामध्ये प्राधान्यक्रमाने शेतकरी नंतर नोकर वर्ग, नोकरवर्गाची नूतन भरतीद्वारे येणारा युवावर्ग, विद्युत पुरवठ्यावर अवलंबून असणारे व्यावसायिक हे सर्व गंभीरपणे भरडले जाणार असल्याचे सांगितले.
सध्या मिळत असलेली शेती पंपासाठी १० अश्वशक्ती पर्यंत मोफत वीज, घरगुती २०० युनिटपर्यंत मोफत वीज या योजना तर बंद होण्याची शक्यता आहेच, त्यासोबत नविन युवावर्ग सरकारी विद्युत कंपनी नोकरीत येऊन स्थैर्य मिळेल अशा आशेने येणार त्यांचे भवितव्य टांगणीला लागण्याची शक्यता आहे, वीजदरवाढ निश्चितपणे लागू होईल या आणि अशा प्रकारच्या शक्यता जास्ती आहेत असे सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधीनी अचानकपणे १७ जूनच्या रात्रीपासून दूधगंगा नदीपात्रातून पाणी उपसा बंदी अंतर्गत पंपसेटचा वीजपुरवठा बंद केल तो किमान जनावरे, नागरीक, शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी नदीकाठच्या पंपसेटना वीजपुरवठा दिवसांतून कांहीं तरी करावा अशी मागणी केली असता सहाय्यक अभियंता बसवराज पुजेरी यांनी वरिष्ठांकडून तशी मंजुरी घेतली आहे आणि तातडीने सात तास वीज वितरण न करता किमान अवधीचा वीज पुरवठा तातडीने करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील, दरेप्पा हवालदार, संजू लठ्ठे, वैभव पाटील, संजीव पाटील, संजय देसाई, संतोष नवले, गिरीश अडके, जंबू इंगळे, शिरिष अडके, भरत हणबर,.संदीप जोशी, सचिन माळगे, अभयकुमार पाटील, रवी दीक्षित, शिवु अनुरे, मयुर तवनक्के, अमित पाटील, अभय बदनीकाई, चेतन पाटील, रोहन नवनाळे, पंकज तिप्पण्णावर, प्रशांत करंगळे, चिदानंद मुतनाळे, मधुकर परगौडर, महावीर उदगावे, अमित हणबर, संतोष हुद्दार,  कुमार बिक्कान्नावर, भरत बदनीकाई, चंद्रकांत हुद्दार, भरत बोरगावे, महादेव खोत, सुकुमार उगारे , बसवराज कोळी, सुरेश हुद्दार, सदानंद मुतनाळे, मुबारक सनदी, कैलास माळगे, मोहन अमृतसम्मनावर, वर्धमान पाटील, दिलीप हणबर, विश्वास शितोळे, संजय अंकले, चंद्रकांत कुप्पानट्टे, रमेश लंगोटे, सुभाष गौराजे आणि शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यातील पदपथाचा (फूटपाथचा) वापर मेंढरांकडून; शालेय विद्यार्थ्यांचे फूटपाथकडे दुर्लक्ष

Spread the love  सदलगा : हे आहे एक अत्यंत मार्मिक आणि बोलके छायाचित्र. सदलग्यातील या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *