Monday , June 22 2026
Breaking News

सदलगा – चित्तापूर नूतन बस सेवा आजपासून प्रारंभ

Spread the love

 

सदलगा : कल्याण कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ गुलबर्गा विभाग क्र १ कडून आजपासून सदलगा – चित्तापूर ही बस सेवा सुरू करण्यात आली. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कलबुर्गी विभागीय नियंत्रक एस. जी. गंगाधर, चित्तापूर आगार व्यवस्थापक गोल्लालप्पा बिरादर यांच्या सहकार्याने ही बस सेवा सुरु करण्यात आली असल्याची माहिती सदलगा माजी नगरसेवक पिरगोंडा पाटील यांनी दिली. या नव्या मार्गावरील बस सेवेचे उद्घाटन येथील गीताश्रम मठाचे मठाधिपती डॉ. श्रद्धानंद स्वामींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
ही बस दररोज सदलग्यातून सकाळी ६ वाजता निघून चित्तापूर येथे संध्याकाळी ५  वाजता पोहचणार आहे. ही बस एक्संबा, रायबाग, हारुगेरी, मुगळखोड, महालिंगपूर, रबकवी- बनहट्टी , जमखंडी, बबलेश्वर, विजयपूर, देवरहिप्परगी, सिंदगी, मोरटगी, अफझलपूर (पुढे कलबुर्गी रस्त्यावर एका चौकातून गाणगापूर पासून केवळ ३ किमी), कलबुर्गी, चित्तापूर अशा मार्गावरून धावणार आहे. चित्तापूरपासून दररोज याच मार्गे सकाळी ७.१५ सुटून सदलगा येथे संध्याकाळी ६.१५ पोचणार आहे.
या मार्गावरील सर्व प्रवाशांना गाणगापूर दत्त दर्शन, अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन, विजयपूर गोल घुमट पर्यटन आणि सिद्धेश्वर स्वामींचे ज्ञानयोग आश्रम आध्यात्मिक पर्यटन, कलबुर्गी मधील परमेश्वर मंदिर दर्शन, प्रसिद्ध बुद्धविहार दर्शन, बंदे-नवाझ दर्गा दर्शन अशा प्रकारचे ऐतिहासिक, धार्मिक पर्यटन करण्यासाठी सोयीचे होत असून या बस सेवेचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन पिरगोंडा पाटील यांनी केले आहे.
गेल्या तीन वर्षांत सदलगा भद्रावती रात्रसेवा, इचलकरंजी उळवी, इचलकरंजी जमखंडी दोन फेऱ्या, इचलकरंजी कलबुर्गी दोन फेऱ्या, सदलगा बेळगांव दोन फेऱ्या, सदलगा सिंधनूर (राघवेंद्र स्वामींच्या मंत्रालयम् ला जाणे सोयीची), इचलकरंजी बागलकोट अशा मोठ्या शहरांना ये-जा करण्यासाठी अनुकूलता करुन दिली आहे. याशिवाय नजिकच्याच दिवसांत सदलग्यातून अक्कलकोट, गुड्डापूर दानम्मा, पुणे-मुंबई यांसाठी तसेच बेळगावी, हुबळीला जास्ती फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी  चालक वाहक यांना शाल, हार, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
पिरगोंड पाटील यांच्यासह इरगोंड पाटील, महादेव पाटील, कल्लाप्पा पडलाळे, महादेव कोल्हापूरे, प्रणील पाटील, पंकज तिप्पण्णावर, डॉ. अमर अडके, अझरुद्दीन शेखजी, अनिल पत्तार, राजू वाली, सुभाष कुंभार, शांतगोंड पाटील, जनवाडचे माझी ग्रामपंचायत अध्यक्ष आनंद मोकाशी, प्रभाकर केरुरे, सदाशीव पाटील, शिरदवाडचे राजू डुणुंग, मालन पाटील, सुजाता पाटील, मृणाली पाटील, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेकडून सदलग्यात रास्तारोको

Spread the love  सदलगा : येथील छ. शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ९.३० वाजल्यापासून कर्नाटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *