मुख्याध्यापक एस. एस. चौगुले : कुर्ली हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन
निपाणी(वार्ता) : भारतीय संस्कृतीत योगाला अनन्य साधारण महत्व दिले आहे.सातत्याने योग व प्राणायाम केल्यास मानसिक आरोग्य चांगले रहाते. जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नियमित योगाभ्यासाचा संदेश समाजात पोहोचविण्याची गरज असल्याचे मत कुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात बोलत होते.
के. ए. नाईक यांनी स्वागत केले. ए. ए. चौगुले व एम. बी. खिरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचा सराव केला. समर्थ पाटील याने ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम, कपालभाती आदी योगप्रकारांचे प्रात्यक्षिक सादर केले. पूर्वा माळी व श्रद्धा माळी या विद्यार्थिनींनी आदीयोग गीतावर योग नृत्य सादरीकरण केले.
पुढे बोलताना चौगुले यांनी योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, तणाव कमी होतो तसेच निरोगी जीवनशैली घडते, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनीही योगाचे महत्त्व जाणून नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी ए. ए. चौगुले, टी. एम. यादव, एस. एस. साळवी, एस. ए. पाटील, पी. व्ही. कांबळे, एम. एस. वाळके, एस. एल. कुंभार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta