नवीन शहा; आंतरराज्य खेळाडूंचा समावेश
निपाणी (वार्ता) : निपाणी टेबल टेनिस असोसिएशनतर्फे येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर २७ व २८ रोजी भव्य खुल्या टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख ८० हजारहून अधिक बक्षिसे, शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती असोशियशनचे अध्यक्ष नवीन शाह यांनी पत्रकार बैठकीत दिली. स्पर्धेमध्ये बळ्ळारी, गदग, बेंगलोर, हुबळी, धारवाड, कुमठा, कलबुर्गी, हल्याळ, शिर्शी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, पुणे, सिंदुधूर्ग, मालवण येथील खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळलेलेअनिस सोनटक्के, अतिश आठवले, जैनम शाह, सान्वी मांडेकर, पृता पर्रिकर, राज सिंगरया आदी सहभागी होणार आहेत. २७ रोजी महिला गटातील सामने होतील. २८ रोजी खुला गट, वयोवृध्द गटाचे सामने होणार आहेत. २७ रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन व त्यानंतर बक्षिस समारंभ त्या होणार असल्याचे शाह यांनी सांगितले.
यावेळी असोसिएशनचे मिलींद चोगुले, संग्राम चव्हाण, उपाध्यक्ष अक्षय उपाध्ये, सेक्रटरी प्रतिक शाह, अतिश खोत, राजू मेहता, प्रणव शाह, डॉ. माधव कुलकर्णी, डॉ. संदिप चिखले, योगेश पुराणीक, राजेश शिंदे, सुशांत वाडेकर, सुहास परमणे, सुरज राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.