निपाणी (वार्ता) : येथील विरूपाक्षलिंग समाधी मठाच्याप्राणलिंग स्वामींच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गावर हैदराबादकडे जाणाऱ्या गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी वाहतूक करणारा वाहनासह संशयित आरोपी आणि १२ टन गोमांस पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हैदराबादकडे एका वाहनातून (एम.एच.१० टी-२६७६) गोमांस जात असल्याची माहिती निपाणी येथील गोरक्षकांना मिळाली त्यानुसार त्यांनी ११२ क्रमांकाला दूरध्वनीवरून याबाबतची माहिती दिली. गोरक्षकांनी सापळा रचून मध्यरात्री बजरंग दल, श्रीराम सेनेच्या मदतीने आरोपी व वाहनाला पकडले. त्यानुसार पोलिसांनी वाहनासह आरोपींना ताब्यात घेतले आहे. परराज्यातून होणाऱ्या गोमांसच्या वाहतुकीचा कार्यकर्त्यांनी निषेध करत अवैध्यरित्या सुरू असणाऱ्या कत्तल खान्यावर बंदी घालावी. वाहतूक करणाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
प्राणलिंग स्वामीजी म्हणाले, अवैध्यरित्या गोमातेची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. बेकादेशीरपणे गोमातेची कत्तल करून हे गोमांस, गोवा, हैदराबाद येथे पाठवले जाते. प्रशासनाने यावर बंदी घालून संबंधितावर कठोर कारवाई करावी.