गव्हाण येथे डॉ. आंबेडकर युवा संघाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : भारतीय समाजात हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा अशा प्रस्थापित व्यवस्थेमध्ये केवळ एक वर्ग सोडून शेतकरी, कामगार, शोषित, वंचित, पीडित व स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वविचाराचे अधिकार प्राप्त झाले नव्हते. अशा प्रवृत्तीमुळे एकाधिकारशाही निर्माण होऊन भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मानवी मूल्य पायदळी तुडवली जात होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने भारतीय संविधानाची निर्मिती झाली. त्यामुळेच खऱ्या अर्थाने समाजात लोकशाही नांदत आहे. भारतीय संविधान हे समतेचे प्रतीक बनल्याचे मत डॉ. आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले. गव्हाण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा संघाच्या उद्घाटन प्रसंगी ते होते.
बामसेफचे जरारखान पठाण यांनी, लोकशाही भक्कम करण्यासाठी संविधान वाचविणे गरजेचे असल्याचे सांगितले. मानव बंधुत्व वेदिकेचे संघटक सदाशिव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावातील भीमसैनिकांच्या वतीने ‘रन फॉर इक्वलिटी’ दिंडी काढून सामाजिक समतेचा संदेश दिला.
कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष अमोल कांबळे, विशाल कांबळे, शिवराज कांबळे, चंद्रकांत कांबळे, आदित्य कांबळे, विशाल कांबळे, चंद्रकांत के. कांबळे, अजय कांबळे, प्रतीक माळगे, विवेक कांबळे, महेश कांबळे, शशिकांत तुळशीकट्टी, अनिल कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सचिन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.