बेळगाव : चलवेनहट्टी येथील कायमस्वरूपी पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून बढती मिळाल्याने गावात पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. तसेच पाणी पुरवठा समितीचीर फेर निवड करण्यात आली असून तीन वर्षांपूर्वी घाईगडबडीत ग्रामस्थांना विश्वासात न घेता पाणी पुरवठा समितीचे निवड करण्यात आली होती तरी सदर निवडीबद्दल गावातील युवकांनी नाराजी व्यक्त केल्याने पाणी पुरवठा समितीची फेर निवड करण्यात आली आहे. यल्लाप्पा पाटील अध्यक्ष तसेच रेखा पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सदस्यपदी रेणुका सनदी, सुमित्रा पाटील, संगीता पाटील, अमोल बडवानाचे, बाबु सनदी, कृष्णा हुंदरे, युवराज पाटील, ग्रामपंचायत पी डी ओ अशी पाणी पुरवठा समितीची निवड ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसेच पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून चंद्रकांत पाटील यांची निवडही याचवेळी एक मताने करण्यात आली आहे. प्रारंभी ग्रामपंचायत तसेच या बैठकीचे अध्यक्ष अमृत मुद्देनवर यांचे तसेच ग्रामपंचायत सदस्य गुंड कुरेनवर, यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निवड झालेल्या नुतन सदस्यांचे पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा कर्मचारी पदासाठी चार व्यक्तींनी अर्ज भरले होते तरी यापैकी दोन सदस्य गैरहजर राहीले तर उत्तम हुंदरे यांनी स्वखुषीने जाहीर माघार घेवून कर्मचारी निवड करण्याचे कार्य सोपे केल्याने त्यांच्या विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा समितीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण बडवानाचे तसेच माजी सदस्य मनोहर हुंदरे यांनी मनोगत व्यक्त केले. भुषण पाटील यांनी सुत्रसंचलन केले. शट्टुप्पा पाटील यांनी अभार मानले.
भरमा सनदी, बाबु पाटील, नारायण पाटील, कनोज बडवानाचे, अमृत रेडेकर, दिपक बडवानाचे, प्रकाश बडवानाचे, अनिल पाटील, नितेश नाथबुवा, परशराम रेडेकर, यल्लाप्पा कितवाडकर, सुरज पाटील, गुंडू पाटील, सिद्राय सनदी, यल्लाप्पा पाटील, गणेश पाटील, पुंडलिक पाटील, इराप्पा घसारी, संदिप आलगोंडी, जोतिबा पाटील, राजू पाटील, सदू पाटील, गजानन बडवानाचे, उपस्थित होते.