मुख्यमंत्री सिध्दरामय्या; बंगळूरात शिक्षक कौतुक परिषद
बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल (धजद) आणि भारतीय जनता पत्र (भाजप) यांच्यातील युती अपवित्र असल्याची टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वासाठी ही युती केल्याचा त्यांनी आरोप केला. केंगेरी येथील शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे पुट्टण्णा निवडून आल्याबद्दल बंगळुरच्या सुलीकेरे मैदानावर आयोजित शिक्षक कौतुक परिषदेत ते बोलत होते.
देवेगौडांच्या वक्तव्यावर टीका करून सिध्दरामय्या म्हणाले, देवेगौडा पक्षाच्या अस्तित्वासाठी भाजपमध्ये दाखल झाल्याचे सांगत आहेत. तुम्ही सर्व शिक्षक जाणकार आहात, डार्विनच्या सिद्धांतानुसार सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट असतो हे लक्षात ठेवा, परंतु माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी स्वत:च्या अस्तित्वासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वासाठी ही युती केली, असे ते म्हणाले.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांना वाटते की, आम्ही जो काही निर्णय घेऊ, लोक तो डोळसपणे स्वीकारतील. परंतु आम्ही जे काही करू ते लोक स्वीकारतील असे वाटणे योग्य नाही.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, भाजपसोबत धजदची युती करण्याचा उद्देश लोकांचे हित नाही. भाजप-धजदच्या अपवित्र युतीनंतरही तुम्ही सर्वांनी तुमच्या निर्णयाचा वापर करून काँग्रेसच्या पुट्टण्णा याना विजयी केलात आणि ज्यांनी भाजपशी अपवित्र युती केली त्यांना धडा शिकवला, मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे, असे ते म्हणाले. या युतीमुळे पुट्टण्णाचा पराभव होईल अशी भीती वाटत होती, पण तुमच्या निर्णयाने आम्हाला धीर दिला आहे. भविष्यात अशाच प्रकारे आघाडीच्या उमेदवारांना डावलून काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे सिद्धरामय्या म्हणाले.
याआधी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भगव्या पक्षाचे सरकार होते, ज्याने युती खाली आणली. स्वार्थ साधणे हाच एकमेव उद्देश आहे, असा टोला त्यांनी लगावला.
माजी पंतप्रधान देवेगौडा आधी म्हणाले होते, की पुढचा जन्म झाला तर मुस्लिम समाजातच जन्म घेईन, पण आता त्यांनी जातीयवादी पक्षाशी हातमिळवणी केली आहे, असे ते म्हणाले.
वेतन आयोगावर बैठकीत निर्णय
मी बैठक बोलावून शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करणार आहे. पुट्टण्णा यांनी त्यांच्या शिक्षकाच्या समस्येबद्दल मला आधीच सांगितले आहे. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांची बैठक बोलावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री एन. चलुवरायस्वामी, रामलिंगा रेड्डी आदी सहभागी झाले होते.