Sunday , July 26 2026
Breaking News

बस खाली सापडून वृद्ध महिला जागीच ठार; चन्नम्मा सर्कल जवळील घटना

Spread the love

 

बेळगाव : रस्ता ओलांडताना परिवहन मंडळाच्या बस खाली सापडून एक वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, ग्रामीण भागातून बेळगाव शहरात आलेली ही 60 वर्षीय महिला चन्नम्मा सर्कल येथे डावीकडून उजवीकडे रस्ता ओलांडत होती. रहदारीच्या वेळी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेली ही महिला थेट परिवहन मंडळाच्या बसच्या मागील चाकाखाली आली आणि ती महिला गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत पावली होती.
ठार झालेल्या मृत महिलेची ओळख तात्काळ पटू शकली नाही. अपघातस्थळी रहदारी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयाकडे पाठवला. सदर महिला शाहू नगर भागातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून नातेवाईकाना अपघाताची कल्पना दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सदर अपघाताची रहदारी उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *