बेळगाव : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या बीकॉमच्या पाचव्या सेमिस्टरची प्रश्नपत्रिका फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिका फुटली. बेळगावातील राणी चन्नम्मा विद्यापीठ प्रशासन अडचणीत आले आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा ओढाताण सुरू झाली आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मूल्यमापन विभागाने प्रश्नपत्रिका फुटल्याची पुष्टी करत परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक जारी केले. बीकॉम पदवीच्या पाचव्या सेमिस्टरच्या आर्थिक व्यवस्थापन विषयाची प्रश्नपत्रिका फुटली असून विद्यापीठाच्या कुलगुरूंनी परिपत्रक काढून परीक्षा रद्द केली आहे.