बेळगाव तारीख 22 अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात बेळगाव जिल्हा विद्याभारती वार्षिक योजना बैठकीचे आयोजन शनिवार तारीख 23 रोजी सकाळी 10.00 वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या बैठकीत विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, उमेश कुमार, वसंत माधव हे जिल्ह्यातील विविध शालेय मुख्याध्यापक शिक्षक व संचालक मंडळ यांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच आगामी 2024- 25 साली घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती व पूर्वनियोजित कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीला विद्याभारती संलग्नित जिल्ह्यातील शालेय शिक्षकवर्ग व मुख्याध्यापकवर्ग उपस्थित राहणार आहे, अशी माहिती विद्याभारती बेळगाव जिल्हा यांच्यावतीने देण्यात आली आहे.