मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा
निपाणी (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत होणाऱ्या अन्यायासह मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि देशातील शेतकऱ्यांच्यावर होत असलला दूर करण्यासाठी आंदोलनाबाबत ही भेट महत्त्वाची होती. मराठा आरक्षणासाठी पुढील दिशा आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टी व दुष्काळ परिस्थितीत मिळणाऱ्या भरपाईसह विविध विषयांवरही चर्चा झाली. रयत संघटना कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी मनोज जरांगे- पाटील यांना कर्नाटक दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले. त्याला जरांगे-पाटील यांनी सकारात्मक होकार देऊन आपण लवकरच कर्नाटक दौऱ्यावर येऊ असे, सुतोवाच केले.
यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पाटील, हातकणंगले तालुका मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, दीपक कोन्नुरे, बंडा पाटील, एन. पी. पाटील, उदय पाटील, अमित गर्जे, दीनानाथ मोरे, प्रवीण केर्ले, राजू जांभळे, संभाजी जाधव, विरेंद्र माने, संकेत पाटील, संकेत कुंभार उपस्थित होते.