महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक संपन्न
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक काल कुर्ली येथे युवा समिती अध्यक्ष बंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सुरवातीला बैठकिचा उद्देश युवा समिती कार्याध्यक्ष अजित पाटील यांनी सविस्तर सांगितला. होऊ घातलेली लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्वाची असून, मराठी भाषिकांना एकत्र येण्याची संधी चालून आली आहे. त्यासंधीचे सोने करून दाखवूया, चिक्कोडी लोकसभा मतदार संघामध्ये मराठी भाषिकाची संख्या लक्षनीय आहे, सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागासाठी काम करायचे आहे, यामध्ये सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे, व्यक्तीगत हेवेदावे बाजूला ठेऊन आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील, सीमाप्रश्नासाठी वेळ देणारा उमेदवार असावा. मराठी भाषा, शिक्षण, संस्कृती या सामाजिक कार्यामध्ये झोकून देऊन काम केले पाहिजे अशीच आमची अपेक्षा लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीमधून उमेदवारी घेणाऱ्या व्यक्तीकडून आहेत.
याबैठकीमध्ये हिंदुराब मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मराठी भाषिकांची होणारी फरफट खूप वाढली आहे, त्यामुळे सरकारची दडपशाही सामान्य मराठी माणसांच्यावर राजरोसपणे सुरु आहे ती थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आलेल्या संकटाला तोंड दिले पाहिजे. कायदेशीर मार्गाचा वापर करून या अरेरावीला उत्तर दिले पाहिजे तरच कर्नाटक प्रशासन नरमाईची भूमिका घेणार आहे, म्हणून आमची तीव्र इच्छा आहे होऊ घातलेली लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा करायला हवा, त्यासाठी चाचपणी करून कोण कोण इच्छुक आहेत पाहून योग्य उमेदवाराला आपली उमेदवारी द्यायची असे विचार व्यक्त केले. त्यानंतर आनंदा रणदिवे यांनी आपले विचार व्यक्त करून सांगितले की, कन्नड सक्ती थांबली पाहिजे, मराठी लोकांना भीती घालून बोर्ड लावण्याची सक्ती केली जात आहे. कन्नड सक्ती शहरातुन आता खेड्यात व्यापारी वर्गाला त्रास देऊन कन्नड मध्येच बोर्ड लावा अशा धमक्या देत आहेत, निपाणी तालुक्यातील लोकांना 100% मराठी भाषा बोलता येते, त्यांना कन्नड काहीच कळत नाही, तरी लोकसभा निवडणूक लढवावी आणि आमची मराठी भाषिकांची टाकत भाषेसाठी काय करू शकते हे निकालातुन स्पष्ट होईलच, आमच्या लोकेच्छा समजून घ्यायला पाहिजेत, चिक्कोडी लोकसभा मतदार संघातुन इच्छुक उमेदवार असतील त्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा, मराठी भाषिकानी एकत्र आल्याशिवाय सध्या कोणताही पर्याय आपल्यापुढे नाही, याचा गांभीर्याने विचार करावा आणि या आमच्या चळवळीमध्ये प्रत्येक मराठी माणसाने सामील झालेच पाहिजे, हा लढा गेली 67 वर्षे झाली सुरु असून आता त्याची जबाबदारी जुन्या व नवीन पिढीच्या खांद्यावर आली आहे, यशस्वीपणे लढा पुढे घेऊन जाऊया, मराठी भाषा टिकली पाहिजे.
युवा समिती उपाध्यक्ष संतोष निढोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, लढा आम्ही जिवंत ठेवला आहे आमची ती जबाबदारी आहे पण निपाणी तालुक्यातील काही ट्रस्ट, ग्रंथालये, रजिस्टर सामाजिक मंडळे, महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत घेण्यासाठी प्रस्ताव पाठवतात आणि आर्थिक मदत घेतात पण महाराष्ट्र एकीकरण युवा समिती असेल किंवा मराठी भाषा टिकली पाहिजे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी कधीच आमच्या सोबत येत नाहीत ही खूप चिंताजनक बाब असून इथून पुढे आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करणार आहोत. निपाणी तालुक्यातील आर्थिक मदतीसाठी कुणीही प्रस्ताव पाठवला तर आम्हाला विचारल्या शिवाय त्यांना आर्थिक मदत नाही द्यायची, चिक्कोडी लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे इच्छुक उमेदवारांची चाचपनी करूया आणि पुढील दिशा ठरवूया, शेवटी युवा समिती मीडिया प्रमुख नेताजी पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. सीमाप्रश्नाच्या लढ्याशी प्रामाणिक राहणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी द्यायची पूर्ण चाचपणी करून निर्णय घेऊया, आणि यासाठी युवा समितीच्या नेतृत्वाखाली लवकरच चिक्कोडी लोकसभा ननिवडणुकीसंदर्भात व्यापक बैठक आयोजित करून त्यामधून नव्या व जुन्या कार्यकर्त्यांची मते काय आहेत ते पण अजमावून पाहूया, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सोबत चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील इतर छोट्या मोट्या संघटना येतील का याची विचारपूस त्यांच्या अध्यक्ष किंवा पदाधिकारी यांना विनंती करून आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा व व्यापक बैठक आयोजित करणार आहोत त्यामध्ये तुमची मते मांडावीत. सीमाप्रश्न, मराठी भाषा, शिक्षण, संस्कृती जिवंत राखण्याची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, व्यापक बैठक लवकरच आयोजित करून चिक्कोडी लोकसभेचा उमेदवार घोषित करण्याचे ठरले.
आभार शिवाजी पाटील यांनी मानले. बैठकीमध्ये मतीवडे, कुर्ली, सौन्दलगा, निपाणी, कोगनोळी, इत्यादी गावातील कार्यकर्ते बैठकिसाठी उपस्थित होते.