खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी लढा देत आहे मात्र काही जण स्वार्थासाठी समितीशी गद्दारी करीत आहेत मात्र समितीशी गद्दारी करणाऱ्यांचे आयुष्यात कधीही भले होणार नाही तसेच खानापूर तालुक्याचा विकास करण्यामध्ये समिती आमदारांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी केले आहे.
कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी मंगळवारी जांबोटी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाषावार प्रांत रचना झाल्यापासून सीमाभागातील 865 गावे महाराष्ट्रात जावीत यासाठी मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे. समितीने कधीही भाषाभेद किंवा धार्मिक वाद निर्माण केलेला नाही मात्र राष्ट्रीय पक्ष जाणीवपूर्वक समिती विरोधात भूमीका घेऊन आपली पोळी भाजून घेत आहे मात्र सुज्ञ मराठी भाषिक समितीच्या पाठीशी कायम राहिले आहेत त्यामुळेच राष्ट्रीय पक्षांना वेगवेगळ्या प्रकारचे आमीष दाखवावे लागते. समितीचे आमदार असताना तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला मात्र विकासाचे गाजर दाखवणाऱ्या राष्ट्रीय पक्षाने विकासाकडेही दुर्लक्ष केले आहेत. बेळगावसह खानापुरातील मराठी फलक काढले जात आहेत त्याबाबत कोणत्याही प्रकारची भूमिका राजकीय पक्ष घेत नाहीत. त्यामुळे त्यांना मराठी भाषेतून मत मागण्याचा कोणताही अधिकार नाही याची जाणीव प्रत्येक मराठी भाषिकांने करुन घेणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
तालुका पंचायतीचे माजी सभापती मारुती परमेकर यांनी राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागून मराठी भाषिकांचे नुकसान करणाऱ्यांना येत्या काळात मराठी भाषिक धडा शिकवितील समितीमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे पुढील काळात देखील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आपली संघटना बळकट करण्यासाठी वेळ द्यावा आणि या निवडणुकीत समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना मोठे मताधिक्य देऊन जांबोटी आणि परिसर समितीचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून द्यावे असे आवाहन केले.
खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, शंकर गावडा, बाळासाहेब शेलार, हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजीत पाटील, मुकुंद पाटील, रवींद्र शिंदे, वसंत नावलकर यांनी मनोगत. सभेला रामचंद्र गावकर, नागेश भोसले, प्रभाकर बिर्जे, सुनिल पाटील, संदेश कोडचवाडकर, अमृत देसाई, वसंत कळेकर, विठ्ठल देसाई, रवींद्र शिंदे, परशराम हवालदार, हनुमंत चिखलकर, प्रकाश देसाई, वसंत नवलकर, प्रभाकर देसाई, गुंडू पाटील, संतोष कर्लेकर, भैरव मुदगेकर, सुधीर नवलकर गुरुदत्त राऊत, हनुमंत मुदगेकर, पुंडलिक पाटील, बाळकृष्ण पाटील, आप्पांना इस्रान, गजानन नारळीकर, विजय ईश्रांत, ज्ञानेश्वर पाटील, कृष्णा धुळ्याचे, रवळू वडगावकर, बाळकृष्ण पाखरे, नागेश परवाडकर, नामदेव पाटील, शुभम महाजन, सुनील सुळे, विनायक पाखरे, मारुती दिसुरकर, मुकुंद पाटील, सुनील पाटील, संदेश कोडचवाडकर, नागेश भोसले, सुरेश देगावकर, रणजीत सावंत, ज्योतिबा देसाई, अर्जुन देसाई, शिवाजी गावकर, टोपांना कलमनकर, सुरेश किनेकर, सुनील वलमनकर, भीमसेन करमळकर, हनुमंत जगताप, परशराम गौसेकर, विवेकानंद पाटील, आनंद शंकर पाटील, रत्नाकर देसाई, गंगाधर देसाई, विठोबा देसाई, संतोष भोसले आदी उपस्थित होते.