बेळगाव : हवामान खात्याने वर्तविलेल्या शक्यतेनुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेळगावमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून आज तालुक्याच्या पूर्व भागातील सांबरा या गावातही वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे फटका बसला आहे.
बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात येणाऱ्या सांबरा या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात ट्रान्सफॉर्मर कोसळून पडून दुचाकींचे नुकसान झाले आहे. सांबरा गावातील मेन रोड वर असणाऱ्या पेट्रोल पंपानजीकचा ट्रान्सफॉर्मर कोसळल्याने रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. सांबरा गावात १८ वर्षानंतर श्री महालक्ष्मी यात्रा भरविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणाहून भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने या भागात हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
आता हे हवामान इतक रौद्र स्वरूप आहे कि ,याच्यापुढे अनधिकृत तच काय अधिकृत होर्डिंग आसूद्या झाले,घरावरील पत्रे ,कच्चे बांधकाम कधी कोस्टल कांही सांगता येत नाही .