बंगळुरू : येत्या ४८ तासांत कर्नाटकात मान्सून दाखल होणार आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा मान्सूनचा पाऊस चांगला होणार असल्याची दिलासादायक बातमी मिळाल्याचे हवामान खात्याने सांगितले.
येत्या ४८ तासांत मान्सून कर्नाटकात दाखल होणार आहे. राज्यात 2 जूनपासून मुसळधार पाऊस पडणार आहे. कोप्पळ, रायचूर, यादगिरी, विजयपूर, बंगळुरू ग्रामीण, बंगळुरू शहर, कोडगु, कोलार, चिक्कबल्लापूर, मंड्या, म्हैसूर, रामनगर, शिमोगा आणि तुमकूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होईल.
उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांसारख्या दक्षिणेकडील अंतर्गत आणि किनारी जिल्ह्यांमध्ये आजपासून पाऊस पडेल. उत्तरेकडील भागात दोन दिवस कोरडे हवामान राहील. त्यानंतर पावसाचे आगमन होणार आहे.
बंगळुरूमध्ये सकाळी सौम्य हवामान असेल आणि संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.