Sunday , September 8 2024
Breaking News

प्रज्वल रेवण्णाला बंगळुरू विमानतळावरून अटक

Spread the love

 

बंगळुरू : सेक्स टेप प्रकरणात जर्मनीत पळून गेलेल्या प्रज्वलरेवण्णाला अखेल पोलिसांनी अटक केली आहे. बंगळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली. गुरुवारी दुपारी इंटरोपलकडून त्याच्या आगमनाची माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांचे विशेष तपास पथक बंगळुरू पोलीस आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विमानतळावरच त्याला अटक करण्यासाठी रणनीती आखली होती. त्यानुसार, एसआयटीने त्याला ताब्यात घेतलं. त्याला तिथूनच थेट सीआयडी कार्यालयात नेण्यात आलं आहे.

प्रज्ज्वल रेवण्णा हा एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचा उमेदवार आहे. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात त्याने मतदान केले होते. त्यानंतर त्याच्या कथित सेक्स व्हिडीओचा पेन ड्राईव्ह बाहेर काढण्यात आला. कर्नाटकमधील अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केले असल्याचे यावरून सांगितले गेले. प्रकरण देशभरात पसरल्यानंतर कर्नाटक सरकारने याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. एसआयटीने सीबीआयमार्फत इंटरपोलला रेवण्णांचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. प्रज्ज्वल रेवण्णावर आतापर्यंत बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रज्वल रेवण्णाच्या खटल्यांच्या तपास करणाऱ्या एसआयटीला गुरुवारी इंटरपोलकडून माहिती मिळाली की प्रज्वल म्युनिकहून लुफ्थान्साच्या फ्लाईटमध्ये चढला. प्रज्वलला घेऊन जाणारे विमान शुक्रवार १२.४९ वाजता बंगळुरू येथे उतरले. इंटरपोलने कर्नाटक अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.०५ वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३५) त्याने जर्मनीतून उड्डाण केलं.

प्रज्वलला प्रथम इमिग्रेशन अधिकारी ताब्यात घेतील. त्याच्या नावाविरोधात असलेल्या लुटआऊट नोटीस अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतर त्याला स्थानिक पोलिसांकडे सोपवलं जाईल. मग एसआयटीकडून स्थानिक पोलीस त्याला ताब्यात घेतील, असं एसआयटीच्या अधिकाऱ्याने त्याच्या आगमनापूर्वी सांगितलं होतं. बंगळुरू पोलिसांनी यावेळी विमानतळावर अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. एसआयटीने त्याच्या दोन बॅगा जप्त करून वेगळ्या कारमध्ये ठेवल्या. त्याला अटक केल्यानंतर मध्यरात्री सीआयडी कार्यालयात नेण्यात आलं. आज त्याला कोर्टात सादर करण्यात येणार आहे. त्याआधी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

आवाजाचा नमुना गोळा करणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वलविरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या तीन एफआयआरमधील प्राथमिक पुरावे हे तिन्ही पीडित महिलांचे जबाब आहेत. तर एसआयटीने दुय्यम पुरावेही तयार केले आहेत, ज्यात प्राणघातक हल्ला दर्शविणारे व्हिडिओ शूट करण्यात आले होते त्या ठिकाणांची पडताळणी करणे आणि शारीरिक गुणधर्मांचे विश्लेषण करणे आणि व्हिडिओमधील लोकांचा आवाज तपासला जाणार आहे. एसआयटी आरोपी आणि पीडितांच्या सेल फोन टॉवर लोकेशन माहितीसारख्या तांत्रिक डेटाचा वापर करत आहे. डझनभर साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी एसआयटीने हसनमधील प्रज्वलच्या शासकीय निवासस्थानातून बेड, खाटा आणि फर्निचर जप्त केले. तसच, आता अटकेनंतर त्याच्या आवाजाचे नमुने आणि डीएनएसह इतर गुणधर्म गोळा केले जाण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

रेणुकास्वामी हत्या प्रकरण : अभिनेता दर्शन आणि इतराविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर

Spread the love  बी. दयानंद; ३,९९१ पानांचे आरोपपत्र बंगळूर : बंगळुर पोलिसांनी बुधवारी रेणुकास्वामी हत्याकांडातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *