Monday , September 21 2026
Breaking News

सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

Spread the love

 

मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी शासनाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या एलकेजी वर्गाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेवर विश्वास व्यक्त केला आहे.

प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे सातवीच्या विद्यार्थ्यांनी, एसडीएमसी सदस्यांनी व शिक्षकवृंदांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ, फुले, पहीलीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून उपलब्ध पाठ्यपुस्तके तसेच गणवेशाचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचेही स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमास शैक्षणिक विभागाचे सीआरपी श्री एस. एम. कुट्रे व श्री ए. एम. कुदबुद्दीन हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी एलकेजी वर्गासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन एसडीएमसी अध्यक्ष श्री. गजानन छप्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सरस्वती पूजन एसडीएमसी उपाध्यक्षा  मोहिनी बाळेकुंद्री यांच्या हस्ते संपन्न झाले.

यानंतर एलकेजी विद्यार्थ्यांचे पालक, एसडीएमसी सदस्य व शिक्षक यांची सभा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री कुट्रे यांनी सरकारी शाळांमधील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “सरकारी शाळेत शिकलेली मुले जीवनात कुठेही यशस्वी होऊ शकतात. व्यावहारिक ज्ञान, संस्कार आणि मोठ्यांचा आदर यांसारख्या मूल्यांचे शिक्षण येथे मिळते,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेळके सर यांनी केले तर प्रास्ताविक  शेरलेकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमास पालक, एसडीएमसी सदस्य, शिक्षकवृंद तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *