Sunday , July 26 2026
Breaking News

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश व पाठ्यपुस्तके; शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण

Spread the love

 

बेळगाव : मागील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश उपलब्ध झाले नव्हते. मात्र यंदाच्या २०२६-२७ या नूतन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आल्याने शालेय परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेळगाव शहरासह परिसरातील सर्व सरकारी शाळांमध्ये सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्ताने प्रत्येक शाळेत पालक सभा आयोजित करण्यात आली होती. पालक, एसडीएमसी सदस्य व शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पाठ्यपुस्तके आणि नवीन गणवेश उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके आणि गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मात्र इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समजते.

‘उत्तम शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य’ या ब्रीदवाक्याखाली नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.

शिक्षण खात्याच्या या नियोजनबद्ध उपक्रमामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचे पालकांकडूनही स्वागत करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *