Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज; डी. के. शिवकुमार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Spread the love

 

बंगळुरू : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना वेग आला असून कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज (शनिवार) सायंकाळी ४ वाजता विधानसौध येथे होणार आहे. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून औपचारिक निवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यपाल गेहलोत यांनी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर काँग्रेसश्रेष्ठींनी तातडीने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व आमदारांना बंगळुरूमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला, विधानपरिषद सभागृह नेते एन. एस. बोसराजू तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला हे निरीक्षक म्हणून बैठकीत सहभागी होणार आहेत.

विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर डी. के. शिवकुमार हे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी दावा सादर करतील. यावेळी काँग्रेस आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असून नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी परवानगी तसेच शपथविधीची वेळ निश्चित करण्याची विनंती करण्यात येणार आहे.

दरम्यान, डी. के. शिवकुमार हे सोमवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असून विधानसौधसमोरील परिसरात शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *