Sunday , July 26 2026
Breaking News

अर्धवट कामामुळे मानकापूरमध्ये अपघातांच्या संख्येत वाढ; ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील इचलकरंजी- हुपरी मार्गावरील माणकापूर बसस्थानक समोरच्या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाच्या प्रमाणात वाढ होत आहे. सदर बसस्थानक समोरच्या रस्त्यालगतच गेल्या दोन- अडीच महिन्यापासून गावातील गटारीच्या सांडपाणी निवारणासाठी चर खुदाई करून निघालेल्या मातीचे ढिगारे रस्त्यावरच टाकलेले आहेत. त्यामुळे सदर रस्ता अरुंद बनला असून या ठिकाणी वरचेवर वाहनांची कोंडी होते. परिणामी प्रवाशांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
इचलकरंजीकडे जाणाऱ्या एका डंपरची व इचलकरंजीहून दुचाकीवरून येणाऱ्या रांगोळी ता. हातकणंगले येथील महाविद्यालयीन युवकांची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे तो जागीच ठार झाला आहे. तर दुचाकीवरील दोन मित्र गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे. यामुळे सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन व माणकापूर ग्रामपंचायत प्रशासनाने समस्या निवारणासाठी व सदर रस्ता रुंदीकरण साठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या गटरबांधकाम ठेकेदारांना योग्य तो सल्ला देवून रांगोळी गावांप्रमाणेच माणकापूर बसस्थानकच्या भिंतीलगत मोठ्या आकाराच्या सिमेंट काँक्रीटच्या पाईपलाईनद्वारे सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा उघड्यावरील गटार बांधकाम करणाऱ्या सदर कंत्राटदाराचे सदरचे काम बंद ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आदेश देण्यात यावेत अशीही मागणी सुज्ञ नागरिक व प्रवाशांमधून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *