Sunday , July 26 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे वतीने हुतात्मा दिन गांभिर्याने पाळण्याचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी संघटनेची बैठक पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, १ जून कन्नड शक्ती विरोधात धारातीर्थी पडलेल्या हुतात्माना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात येणार आहे.
तसेच कन्नड सक्तीवरुन जी दडपशाही सुरू त्या कन्नड शक्तीच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मोर्चा काढण्याचे ठरले आहे या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपण या बैठकीत आपले मनोगत व्यक्त करण्याची सूचना केली.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नड शक्तीच्या आंदोलनातील हुतात्माना अभिवादन तसेच कन्नड शक्तीच्या विरोधात मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आणी सिमाप्रश्न तातडीने सोडविण्यासाठी एक लाख सह्यांची मोहीम राबविण्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी घटक समित्यांच्या बैठका घेऊन आपला निर्णय जाहीर कळवावा यासाठी युवा समिती सीमाभाग संघटनेचा वतीने हुतात्माना अभिवादन करण्यासाठी हिंडलगा येथे सीमावासियांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे. तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जी मोर्चाची तारीख ठरेल त्या मोर्चात देखील मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सरचीटणीस मनोहर हुंदरे, पिराजी मुंचडीकर, इंद्रजित धामणेकर, नारायण मुंचडीकर, मोतेश बारदेसकर, सुधीर शिरोळे, सचीन दळवी, रमेश माळवी, सुरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, निलेश काकतकर, राजू पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *