बेळगाव : गोवावेस येथील मनपा इमारतीत असलेल्या महानगर निगम बेळगाव महसूल विभागामध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गोवावेस तेथील महानगरपालिकेच्या इमारतीत वार्ड क्र १ ते २६ दक्षिण विभागाचा कारभार चालतो. सकाळी १०-३० वाजता. ऑफिस कर्मचाऱ्यारी प्रवेश केल्यानंतर महत्वाची कागदपत्रे विस्कटल्याचे आढळून आले. तसेच एक लॅपटॉप देखील चोरीस गेल्याचे सांगण्यात आले. सकाळपासून कर्मचारी बाहेरच थांबून राहावे लागले गेल्या सहा महिन्यात पूर्वी याच कार्यालयामध्ये चोरीची घटना घडली होती.
पहाटेच्या सुमारास मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून चोरट्यांनी आत प्रवेश करून चोरी केल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे आणि आतून दरवाजा पुन्हा आहे तसा लावून निघून गेल्याचे समजते. हि घटना समजताच टिळकवाडी पोलिसांनी त्वरित या ठिकाणी जाऊन घटनेची माहिती घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले व पुढील तपास टिळकवाडी पोलीस करत आहेत.