Sunday , October 27 2024
Breaking News

बेळगावात बकरी ईद सण उत्साहात; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा

Spread the love

 

बेळगाव : बलिदानाचे प्रतीक असलेला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-अधा किंवा बकरी ईद मोठ्या धार्मिकतेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईदच्या निमित्ताने सामूहिक नमाज अदा ‘ईद-उल-अधा ‘ हा सण इस्लामिक कॅलेंडरच्या 12व्या महिन्यात म्हणजेच ए-जिल्हिज्जा महिन्यात साजरा केला जातो. मुस्लिम समाजातील लोकांसाठी हा सण खूप खास आहे. बलिदानाचे प्रतीक असलेल्या ईद-उल-अधाला बकरी ईद असेही म्हणतात. मुस्लीम बांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात आणि त्यांची भक्ती दर्शवतात तेव्हा हा एक विशेष काळ असतो. बकरी ईद, ईद-उल-फित्रच्या दोन महिन्यांनंतर साजरी केली जाते. मुस्लिमांसाठी हा आणखी एक महत्त्वाचा सण आहे. मुस्लिम समाजासाठी हा आनंदाचा आणि उत्सवाचा काळ आहे.

बेळगावात आज मुस्लिम समाजातर्फे बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील अंजुमन-ए-इस्लामच्या ईदगाह मैदानावर सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली आणि ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. प्रत्येक मुस्लिम भाविक पवित्र महिन्यात हज पूर्ण करण्यासाठी मक्काला भेट देतात आणि नंतर ईद सण साजरा करतात. देशभरात साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवशी पहाटे मुस्लिम भाविक ईदगाह मैदान आणि मशिदींमध्ये ईदनिमित्त विशेष सामूहिक नमाज अदा करतात. बेळगावात मौलाना अब्दुल रझाक मोमीन, नईम खतीब यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्यात आली.

यावेळी मुफ्ती अब्दुल अजीज काझी आणि जुहेर काझी यांनी सामूहिक नमाज अदा करून देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी प्रार्थना केली. सणाचे महत्त्व विशद करताना त्यांनी देशात शांतता आणि सलोखा नांदावी अशी शुभेच्छा दिल्या. इतर कोणालाही त्रास न देता सण साजरा करण्याचे आवाहन केले. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि त्यांचा मुलगा अमन सेठ यांनी सर्वांना ईद उल अधाच्या शुभेच्छा दिल्या. बेळगावात हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन सण साजरा करत आहेत. बेळगावातील हिंदू-मुस्लीम नाते असेच कायम राहावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात हजारो मुस्लिम भाविक सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

कोणत्याही परिस्थितीत काळ्या दिनाची सायकल फेरी काढणारच; पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत समिती नेत्यांचा निर्धार

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण यापूर्वीही आला होता. त्यावेळीही काळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *