पूरग्रस्त गावांना दिल्या भेटी
निपाणी (वार्ता) : आठवडाभर पडणाऱ्याया पावसामुळे निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निपाणी मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन प्रशासनाने सर्वतोपरी यंत्रणा साजरी केली असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन खासदार प्रियांका जायकीहोळी यांनी केले. निपाणी मतदारसंघातील जत्राट, हुन्नरगी, सिदनाळसह इतर पूरग्रस्त गावांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
खासदार जारकीहोळी म्हणाल्या, अनेक वर्षापासून नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांना पुराचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पूर परिस्थिती गावांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी पुराचे गांभीर्य ओळखून वेळेवर स्थलांतरित होणे गरजेचे आहे. घरांची पडझड आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित ग्रामपंचायत पीडीओसी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तहसीलदार मिजफ्फार बळीगार, गावकामगार पाटील शिवसागर पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी राणामाळे, नवनाथ चव्हाण, दत्ता हावण, गोपी जबडे, बाबासो खोकाटे, राजू मकानदार, प्रशांत हंडोरे, अमोल बन्ने, प्रतीक शहा, दयानंद कडपट्टी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.