पेव्हर्स बसविण्याचे काम सुरु
येळ्ळूर : येळ्ळूर गावातील एक मुख्य चौक असलेल्या लक्ष्मी चौकाचे सुशोभीकरण बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या सहकार्यातून होत आहे, आमदार अभय पाटील यांनी या चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी स्पेशल फंड मंजूर केला असून, त्यांच्या सहकार्यातूनच लक्ष्मी चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे. संपूर्ण चौकात पेव्हर्स बसवून त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे, सिद्धेश्वर गल्लीतील युवकांनी आमदारांना निवेदन देताच आमदारांनी कार्यतत्परता दाखवत या चौकाच्या सुशोभीकरणाला तात्काळ सुरुवात केली आहे, त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रविवार( ता. 4) रोजी लक्ष्मी चौकामध्ये पेव्हर्स बसविण्याच्या कामातला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रा. सी. एम. गोरल यांनी लक्ष्मी चौकाच्या सुशोभीकरणाची पार्श्वभूमी सांगितली व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी जेसीबीचे पूजन आमदारांचे बंधू शितल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर पेव्हर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ अभियंते व सरकारी कंत्राटदार विजय धामणेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सिद्धेश्वर युवक मंडळाच्या वतीने आमदारांचे बंधू शितल पाटील, अभियंते व कंत्राटदार विजय धामणेकर, अभियंते विवेक धामणेकर, ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील, राजकुंवर पावले, विलास बेडरे, शशिकांत धुळजी, शांता काकतकर, रेणुका मेलगे, कल्लाप्पा मेलगे, शांता मासेकर, प्रदीप सुतार, राजू डोन्यान्नावर, यल्लाप्पा गोरल, डॉ. तानाजी पावले, नारायण काकतकर, डी. जी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील यांनी आमदार अभय पाटील यांनी गावांमध्ये केलेल्या कामांचा आढावा घेतला व उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे सांगितले, यावेळी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी जी. पाटील यांनीही आमदारांनी गावात केलेल्या विकास कामाचे कौतुक केले. यावेळी सुरज गोरल, बाळू कणबरकर, यल्लुप्पा पाटील, लक्ष्मण बेकवाडकर, शिवाजी पाटील, यल्लाप्पा गोरल, जोतिबा उडकेकर, चिंगटू गोरल, राजाराम काटकर, वसंत काटकर, सहदेव काटकर, संदेश डोन्यान्नावर, हर्ष काटकर, प्रमोद देसुरकर, उमेश काटकर, नारायण गोरल, रविकांत पाटील, संदीप मेलगे, रवी सुतार, गंगाराम कणबरकर, पिंटू गोरल, प्रभाकर कणबरकर, पत्रकार बी. एन. मजुकर, ऋषिकेश मजुकर, अरुण कणबरकर आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले तर आभार जोतिबा उडकेकर यांनी मानले.