बेळगाव : मराठा मंदिराच्या वतीने आज बेळगाव येथे एका विशेष कार्यक्रमात नव्याने पात्र ठरलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मंदिराच्या सदस्यांनी सीएच्या कार्याचे आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नामिनाथ कांग्राळकर, सचिव बाळासाहेब काकतकर, लक्ष्मणराव सैयनुचे, लक्ष्मण होंनगेकर, विश्वास घोरपडे, शिवाजी हांगीरगेकर, चंद्रकांत गूंडकल, दिनकर घोरपडे आणि अनिल जाम्बोटकर यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन सीएंचा गौरव करण्यात आला.
सन्मानित झालेले सीए पुढीलप्रमाणे आहेत: नवीन पात्र सीए यादी (मे २०२४ परीक्षा):
1. अभ्युदय एस. पाटील
2. तेजस्विनी कग्राळकर
3. शिवंआनद मंडोलकर
4. अंजली अश्टेकर
5. जीवनू शाहापूरकर
6. स्वाती गावडे
7. स्वप्नील पाटील
कार्यक्रमाची सुरुवात सचिव बाळासाहेब काकतकर यांनी स्वागत करून केली. मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांनी सीएंना अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत गूंदकल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सीएंनी मराठा मंदिराबद्दल आपले विचार मांडले, ज्यामध्ये त्यांनी मंदिराच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यातील सहकार्याची तयारी दर्शवली. कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष नेमिनाथ कग्राळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमामुळे मराठा मंदिराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमध्ये भर पडली.