चंदगड : मराठा लाईट एन्फ्ंट्री बेळगाव येथे सेवा बजावत असताना चंदगड तालुक्यातील जवानाचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. हवालदार सुनील वसंत सलाम, वय ३७ (११ मराठा) मुळगाव घुल्लेवाडी, तालुका चंदगड असे दुर्दैवी जवानाचे नाव आहे. ड्युटीवर असताना आज दि. १७/०८/२०२४ रोजी सकाळी दहा वाजता हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते देशसेवेसाठी लष्करामध्ये भरती झाले होते. या उमद्या युवकाचे देशसेवा बजावत असताना अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने पंचक्रोशीसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी, भाऊ, भावजय असा परीवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर मूळ गाव घुल्लेवाडी येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.