गदग : गदग जिल्ह्यातील नरगुंद तालुक्यातील कोन्नूर येथे परिवहन मंडळाची बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात हावेरी येथील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. रुद्रप्पा अंगडी (55), पत्नी राजेश्वरी (45), मुलगी ऐश्वर्या (16) आणि मुलगा विजय (12) अशी मृतांची नावे आहेत.
हे कुटुंब कल्लापुर बसवेश्वर मंदिराकडे कारने जात असताना बागलकोट जिल्ह्यातील इलकल येथून हुबळीकडे येणाऱ्या सरकारी बसला धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना नरगुंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.