Monday , September 21 2026
Breaking News

इस्कॉनमध्ये उद्यापासून विविध कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत् संघ (इस्कॉन) च्या वतीने जन्माष्टमीच्या निमित्ताने 19 ते 27 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

19 ला बलराम जयंती
19 ऑगस्ट रोजी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलांनंद मंदिरात श्री बलराम जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर सोमवारपासून 26 ऑगस्ट पर्यंत रोज सायंकाळी साडेसहा वाजता परमपूज्य भक्ती रसामृतस्वामी महाराज यांचे कृष्ण कथा कथन होईल. या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी
सोमवार दि. 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीनिमित्त पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, नाट्यलीला आणि कृष्ण कथाकथन आदी कार्यक्रम होणार असून रात्री सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे.

27 रोजी श्रील प्रभूपाद यांचा जन्मदिन
जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी इस्कॉनचे संस्थापक आचार्य प.पू.श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस असल्याने तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्त मंदिरात सकाळपासून दुपारपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून प्रभुपाद यांच्या जीवनावर अनेक भक्तांची भाषणे होतील. तसेच भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन होईल. त्यानंतर दुपारी सर्वांसाठी महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन बेळगावतर्फे करण्यात आले आहे

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *