Friday , November 22 2024
Breaking News

आवश्यकता भसल्यास कुमारस्वामीना अटक करू

Spread the love

 

मुख्यमंत्री सिध्दरामय्या; राज्यपालांवर पक्षपाताचा आरोप

बंगळूर : गरज भासल्यास न डगमगता माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना अटक करू, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात श्री साई वेंकटेश्वर मिनरल्स कंपनीला ५५० एकर खाण लीज देऊन खाण आणि खनिज नियमांचे उल्लंघन केल्याचा कुमारस्वामी यांच्यावर आरोप आहे.
अलमट्टी येथे जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना अटक करणे आवश्यक असल्यास, आम्ही न डगमगता त्यांना अटक करू. मात्र आता अटकेची परिस्थिती आलेली नाही, असे ते म्हणाले.
कुमारस्वामी आधीच घाबरले आहेत. बेकायदेशीर खाण प्रकरणाच्या चौकशीला राज्यपाल परवानगी देऊ शकतात, अशी भीती त्यांना वाटत आहे. लोकायुक्त एसआयटीने त्याच्याविरुद्ध तपास अहवाल सादर करण्याची परवानगी मागितली परंतु राज्यपालांनी कोणतीही कारवाई न केल्याने एसआयटीने पुन्हा अर्ज केला.
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या बाबतीत, राज्यपालांनी विलंबाचे धोरण अवलंबत कोणत्याही तपास अहवालाचा आधार न घेता केवळ माझ्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. हा भेदभावाशिवाय काही आहे का, असा कडवट सवाल त्यांनी केला.
कुमारस्वामी यांनी मुडा प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जारी केल्याबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, की त्यांना या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. कुमारस्वामी तोंडाला येईल तसे बोलतात. त्यांचे शब्द ‘हिट अँड रन’ सारखे आहेत. त्याच्या खिशात पेन ड्राईव्ह असल्याचे त्यानी सांगितले. एक दिवसही दाखवला नाही. तुम्ही (माध्यमे) कुमारस्वामींचे ऐकत नव्हता का, असा सवाल त्यांनी केला.
कुमारस्वामी खोटे बोलून स्वतःला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुडा प्रकरणात मी कोणतेही पत्र लिहिलेले नाही. कुमारस्वामी यांनी खोटे कागदपत्र दिले असावेत. मी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही. पदयात्रा असताना विरोधी पक्षांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही, असा सवाल त्यांनी केला.
कोप्पळमधील विमान विकासावर भाष्य करताना ते म्हणाले, “आम्ही कामात राजकारण करत नाही. कोप्पळवर विशेष प्रेम आहे. जिल्ह्यातील जनतेला संशय येऊ नये म्हणून आम्ही कारवाई करू, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले.
मुगाच्या दरात घसरण झाल्याने आधारभूत किंमतीने खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोप्पळला भेट देऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलिसांकडून ध्वजवंदन स्वीकारले. मंत्री एम. बी. पाटील व अधिकारी उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

9 ते 20 डिसेंबर दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन

Spread the loveबेळगाव : येत्या 9 ते 20 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधान सौध येथे राज्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *