Thursday , September 19 2024
Breaking News

‘गिरीस्तुती’ आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मारली; बेंगळूर अर्बनच्या अथर्व वेंकटेश व लीह आर. जोसेफ यांची बाजी

Spread the love

 

बेळगाव : बेंगळूर अर्बनच्या अथर्व वेंकटेश व लीह आर जोसेफ या बुद्धीबळपटूंनी गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत बाजी मारली.

शास्त्रीनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे झालेल्या कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुला गट फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप-2024 स्पर्धेत बेंगळूर अर्बनच्या अथर्व वेंकटेश याने पहिला तर म्हैसूरच्या ईश्वर विरप्पन आयप्पन व बेंगळूर अर्बनच्या समक्ष अशोक याने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला.
तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत बेंगळूर अर्बनच्या लीह आर जोसेफ हिने पहिला तर बेंगळूरच्या इंदुषीतला व उत्तर कन्नडच्या अन्विता साथी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला.

या दोन्ही गटातील पहिल्या तीन विजेत्यांना एमएलआयआरसी, बेळगावचे कमांडिंग ऑफिसर, कर्नल कृष्ण कुमार, बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे (बीडीसीए) अध्यक्ष दिनेश बिराडे यांच्या हस्ते अनुक्रमे 12 हजार, 8 हजार, 6 हजार रुपये आणि चषक देऊन सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे (बीडीसीए) उपाध्यक्ष एस. जी बागेवाडी, इंडस इंटरनॅशनल स्कूलचे मार्केटिंग प्रमुख उज्वल दास, गुजराती नवरात्री उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश लड्डा, उपाध्यक्ष पंकज शाह, सचिव विजय भद्रा, मंडळाचे सदस्य बिपीनभाई पटेल, बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे (बीडीसीए) संस्थापक सदस्य प्रकाश कुलकर्णी, गिरीस्तुती चेकमेट स्कूल ऑफ चेस फौंडेशनचे संचालक आणि ज्येष्ठ बुद्धीबळ प्रशिक्षक गिरीश बाचीकर, मुख्य अर्बीटर प्रमोदराज मोरे (आयए) उप मुख्य अर्बीटर प्रणेश यादव के (आयए) आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
11 वर्षाखालील फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप खुल्या गटात इंद्रजीत मजुमदार (बेंगळूर अर्बन), ईशान भन्साली (बेंगळूर अर्बन), आरव दास (बेंगळूर), ईशान ए (बेंगळूर अर्बन), विवान होटा (बेंगळूर), रुद्रांश पी. एस. (बेंगळूर), समर्थ नटराज नायडू (बेंगळूर अर्बन), विहान आदर्श लोबो (मंगळूर), विहान शेट्टी (मंगळूर), अभिनव आनंद (बेंगळूर अर्बन), वेंकट नागा कार्तिक मल्लाडी (बेंगळूर अर्बन) आणि अशांक कैलास गोलीवडेकर (बेंगळूर अर्बन) यांनी अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक पटकाविला.
11 वर्षाखालील मुलींच्या गटात आराध्या गौडा (बेंगळूर अर्बन), श्रेया राजेश (बेंगळूर), शशीनी पुवी (बेंगळूर अर्बन), अर्ना जैन (बेंगळूर), रिशिता महाजन (बेंगळूर), श्राव्या वैद्य (बेंगळूर), पेन्मेस्ता सर्वनी (बेंगळूर), दिशी मखीजा (बेंगळूर), निसर्गा गिरिषा प्रिया (बेंगळूर), राजेश्वरी अय्यप्पन (म्हैसूर), नेसरा अरुण कुमार (बेंगळूर अर्बन) आणि दत्ता माही (बेंगळूर अर्बन) यांनी अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक पटकाविला.
या दोन्ही गटातील चौथ्या ते पंधराव्या क्रमांकांच्या विजेत्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे 5 हजार, 3 हजार 500 रुपये, 3 हजार 500, 2500, 2000, 1500, 1500, 1000, 1000, 1000, 1000, 1000 रुपये बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
याशिवाय मुलांच्या विभागातील 9 वर्षांखालील वयोगटातील विवान पांडे (बेंगळूर अर्बन), अद्विक अभिनव कृष्णा (बेंगळूर अर्बन), अवनीश देवाडीगा (बेंगळूर अर्बन), हर्षित राम बी (बेंगळूर), चयांक रमेश (बेंगळूर अर्बन), अरविंद एस. आर.(बेंगळूर ग्रामीण), ध्रुव के. दिलीप (बेंगळूर अर्बन), हिमांश कार्तिकेय अलाहरी (बेंगळूर अर्बन), निश्चित गुरुकर के (चिक्कमंगळूर), माधवा व्यासराज तंत्रि (उडपी) या 10 उत्कृष्ट बुद्धीबळपटूंना तसेच
7 वर्षाखालील वयोगटातील परीक्षित एस. एम. (बेळगाव), राजवीर गिरीश बाचीकर (बेळगाव) युवान प्रकाश महांतशेट्टी (बेळगाव), समर्थ पोळ (बेळगाव), यश महाजन (बेळगाव), शार्विल शेडबाळकर (बेळगाव), वीरभूषण यल्लम्मनवर (बेळगाव) तसेच मोहक पांडे (बेळगाव) ह्या अनुक्रमे पहिला ते आठवा क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंना चषक ( ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले.

मुलींच्या 9 वर्षाखालील वयोगटात चारुशी बी (बेंगळूर अर्बन), अवयुक्ता नायर (बेंगळूर), हनिष्का मिश्रा (बेंगळूर), दीप्ती जयप्रकाश (बेंगळूर अर्बन), राधिका रॉय (बेंगळूर), आध्या हेग्गेरी (हावेरी), आरोही कुलकर्णी (बेंगळूर), आरोही पाटील (बेळगाव), मिशीका सिंघानिया (हुबळी) व सन्नीधी भोगल (बळळारी) यांनी अनुक्रमे पहिला ते दहावा क्रमांक पटकविलेल्या बुद्धीबळपटूंचा तसेच
7 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिला आणि दुसरा क्रमांक मिळविलेल्या विक्षिता टी (शिवमोगा) व इशानवी संतोषकुमार (बेळगाव) यांचा चषक ( ट्रॉफी) देऊन सन्मान करण्यात आला.

स्पर्धेसाठी मुख्य अर्बीटर म्हणून प्रमोदराज मोरे (आयए), उप मुख्य अर्बीटर म्हणून प्रणेश यादव के (आयए) तर अर्बीटर म्हणून आकाश मडीवाळर (एसएनए) व सक्षम जाधव (एसएनए) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन शालगार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीडीसीए पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *