निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय प्राथमिक, माध्यमिक व श्री वेंकटेश्वरा पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक दिन कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका वठवून शिक्षकाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानी नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ, योगिता धुमाळ उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. एस. एस. पचंडी यांनी प्रास्ताविक केले. विक्रमादित्य धुमाळ यांनी, गुरू ज्ञानाचा सागर आणि गुरू विश्वाचा आधार आहे. गुरुविना जीवनात प्रगती अशक्य आहे. विद्यार्थी घडवणारा शिक्षक खुप महत्वाचा असल्याचे सांगितले. योगिता धुमाळ, एम. डी. खोत, व्ही. एम. बाचणे यांनी, गुरूंनी शिकवलेल्या संस्काराची, ज्ञानाची जपणूक करून ती पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी आदित्य खोत, श्रुती शिंदे, सिद्धेश तोडकर, सिफा कमते, प्रथमेश कांबळे, भक्ती पाटील, आदित्य पारगे, प्रथमेश कांबळे, दर्शन कुराडे, गौरी कांबळे, आयमन पटवेगार, आरती बन्ने, प्रज्वल कटके, इकरा बागवान, प्रद्युम सुलकुडे, सानवी पाटणकर, सलोनी रोहिदास, माणसी खोत, भक्ती पाटील, वैजयंती खोत, सिफा कमते, ऐश्वर्या चव्हाण, वैभवी पोटे, शुभम रोहिदास, तेजस कांबळे, शिवतेज कुराडे या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून ज्ञानार्जन केले. कार्यक्रमास यु. आर. पवार, एस. बी. पवार, आर. एस. चव्हाण, व्ही. बी. पाटील, एस. आय. किवंडा, एस. पी. जगदाळे, यु वाय. आवटे, एस. आर. सकपाळ, ए. एम. कुंभार, यु. एम पाटील, एस. के. जोशी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. आदित्य खोत यांनी आभार मानले.