गेल्या वर्षभरापासून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांच्या लढ्याला यश.
चंदगड : देवरवाडी गावात सुरू असलेले अनेक भोंगळ कारभार लपविण्यासाठी ग्रामसभा न घेण्याचे महानाट्य रचण्यात येत होते,
ग्रामपंचायत अधिनियम नुसार गावात ग्राम सभा घेण्याचा नियम असून सुद्धा टाळाटाळ करून ग्रामसभा घेण्यात आली नाही तर या विरोधात प्रेरणा पुरस्कार विजेते ग्राम पंचायत विद्यमान सदस्य, श्री. राजाराम हिरामणी जाधव, श्री. ब. धो. कांबळे (गुरुजी) व सदस्या सौ. क्रांती दिलीप सुतार, सौ. जयश्री बाळाराम करडे यांनी आवाज उठविला व मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सर्व योग्य त्या बाबींची चौकशी करत आजअखेर ती तक्रार निकाली काढली व महिला सरपंचाला अपात्र घोषित केले. तसेच जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात ग्रामसेवक याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे नमूद केले आहे.
——————————————————————-
“गावासाठी नेमण्यात आलेल्या कोणत्याच लोकसेवकाकडून गावाच्या विकासासंदर्भात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही” असे वरील विषयास प्रतिक्रिया देताना ग्रामपंचायत सदस्य श्री. राजाराम जाधव म्हणाले.