दोन एफआयआर दाखल; छळ, लाच, जातीवाचक शिवीगाळचा आरोप
बंगळूर : कंत्राटदाराच्या जीवाला धोका आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार मुनीरत्न नायडू यांना शनिवारी कोलार येथे पोलिसांनी ताब्यात घेतले.
भाजप आमदार मुनीरत्न यांनी आपल्या जीवाला धोका निर्माण केला, जातिवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार चलुवराजू या ठेकेदाराने पोलिसांत केली होती.
आरआर नगर मतदारसंघातील आमदार मुनीरत्न, जे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल होताच फरार होते, त्याना आज संध्याकाळी कोलार जिल्ह्यातील मुलबागीलू तालुक्यातील नांगली गावात अटक करण्यात आली.
कोलारहून आंध्रमधील चित्तूरला निघालेल्या मुनीरत्नाचा मोबाईल फोन लोकेशनच्या आधारे शोध घेण्यात आला. नंतर पोलिसांनी त्याना ताब्यात घेतले.
मुनीरत्न याना कोलार पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याना बंगळुरूला आणले जात आहे. बंगळुरला आणल्यानंतर त्याना बंगळुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
भाजप आमदार मुनीरत्न यांच्या विरोधात छळ, धमकावणे आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
बीबीएमपी कंत्राटदार चेलुवराजू यांनी दाखल केलेल्या पहिल्या एफआयआरमध्ये आमदारानी ३० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आणि रक्कम न दिल्यास करार रद्द करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे
तक्रारीत, मुनीरत्न यांनी सुरुवातीला २०२१ मध्ये घनकचरा विल्हेवाटीच्या कंत्राटापोटी २० लाख रुपयांची मागणी केली होती. तथापि, कचरा व्यवस्थापन करारासाठी १० ऑटो ट्रिपर खरेदी करण्यासाठी पैसे देऊनही, त्यांना त्या वाहनांचे वाटप नागरी संस्थेने केले नाही. एफआयआरमध्ये आरोप आहे की चेलुवराजू यांना आमदारानी वारंवार त्रास दिला आणि शाब्दिक शिवीगाळ आणि शारीरिक मारहाण केली.
तक्रारीत त्यांनी आरोप केला आहे, की आमदारानी त्यांनी त्यांची कर्तव्ये पार पाडू दिली नाहीत. सप्टेंबर २०२३ मध्ये कपाळावर चापट मारली. कंत्राटदाराला धमकावणे, शिवीगाळ करणे आणि त्रास देणे या आरोपाखाली आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांसह तिघांचीही एफआयआरमध्ये नावे आहेत.
वारंवार होणाऱ्या छळामुळे आपण स्वत:चा जीव देण्याचा विचार केल्याचा आरोप चेलुवराजू यांनी केला. तसेच, त्यानी स्वत: आणि आरोपी आमदार यांच्यातील दूरध्वनी संभाषणाचा ऑडिओ जारी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार मुनीरत्न यांच्या विरोधात बीबीएमपी नगरसेवकाच्या तक्रारीवरून दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे ज्याना आमदार मुनीरत्न यांनी जातीवाचक शिविगाळ करून त्यांचा आणि कुटुंबाचा अपमान केल्याचा आरोप केला. आमदार मुनीरत्ना यांनी चलुवराजू यांना जातीच्या कारणावरून नगरसेवकाशी हातमिळवणी करू नये, असे सांगितले होते.
एससी आणि एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मिळालेल्या तक्रारींच्या आधारे आम्ही आमदाराविरुद्ध धमकावणे, छळ, लाचखोरी आणि जातीवाचक शिवीगाळ या आरोपाखाली दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.