बेळगाव : येळ्ळूर येथील कलमेश्वर मंदिरानजीक असलेल्या विजेचा खांब अखेर हटविल्याने मोठ्या वाहनांना होणारा अडथळा दूर झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
येळ्ळूर येथील कलमेश्वर मंदिराजवळ एक विद्युत खांब मागील 25 ते 30 वर्षे होता. सध्या कलमेश्वर मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनिकरणाचे काम चालू आहे. सदर खांबाच्या विद्युत भरीत तारा मंदिराशेजारून गेल्यामुळे सुशोभीकरणाच्या कामात अडथळा येत होता. तसेच गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत त्याचप्रमाणे मोठ्या वाहनांना अडथळे निर्माण होत होते. याची दखल वॉर्ड क्रमांक 2 चे ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे यांनी घेत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून देत सदर खांब अन्यत्र हलविला आणि या ठिकाणी त्या खांबामुळे होणारा अडथळा दूर केला. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.