Sunday , September 22 2024
Breaking News

बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी राबवले स्वच्छता अभियान

Spread the love

 

बेळगाव : नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बेनकनहळी, सावगाव, गणेशपुर, नानावाडी, मंडोळी, हंगरगा, सुरेश अंगडी रोड बोकमुर, बेळगुंदी परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन सावगाव तलावात करण्यात येते. तलाव व परिसरात खूप ठिकाणी व पाण्यामधे प्लास्टिक व निर्माल्य पसरलेले होते म्हणून बेनकनहळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी पुढाकार घेऊन या परिसरात स्वच्छता अभियान राबवले.

शनिवार दिनांक 21/09/2024 रोजी सकाळी ठिक 06-30 वाजता सावगांव गावातील धरणाजवळील परिसरात स्वच्छता करण्यास सुरवात केली. या अभियानमध्ये त्यांच्या सोबत मराठा लाईफ इन्फ्रट्री बटालियन मेजर संतोष व मेजर विक्रम व ले. कर्नल भरत राव व त्यांची रेस्क्यू टीम, बेनकनहळी ग्रपंचायत उपाध्यक्ष सायराबानु हुक्केरी व पंचायतचे सेक्रेटरी प्ररताप मोहीते व कर्मचारी, आरोग्य खाते अधिकारी व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांनी व गावातील अनेक युवकांनी सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात पूर्व वैमनस्यातून खून

Spread the love  बेळगाव : पूर्व वैमनस्यातून खून करून अपघात भासवण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीला यमकनमर्डी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *