बेळगाव : गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यातर्फे आज मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी प्राध्यापिका संध्या चौगुले, सातारा यांचे “शिक्षकांसाठी शिक्षणातील बदलते प्रवाह व शैक्षणिक नवोपक्रम” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापिका संध्या चौगुले यांचे पुष्पगुच्छ देऊन श्री. सुभाष ओऊळकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नीला आपटे, पाहुण्यांची ओळख श्री. गजानन सावंत यांनी करून दिली. प्राध्यापिका संध्या चौगुले यांनी आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून बदलते शैक्षणिक प्रवाह कसे आत्मसात करावेत. पर्यावरण पूरक उपक्रम घेऊन ते अभ्यासाशी कसे जोडावेत याविषयी मार्गदर्शन केले. सुभाष ओऊळकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना बालक हे सर्जनशील असतात, त्यांना आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्या सर्जनशीलतेला मोकळीक दिली पाहिजे असे उद्गार काढले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक श्री. शिवाजीदादा कागणीकर, ज्योती मजुकर व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्राध्यापक सुरेश पाटील यांनी मांडले.