बंगळूर : यावर्षी १ नोव्हेंबर रोजी ५० वा कन्नड राज्योत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सर्व शाळा, महाविद्यालये, कारखाने आणि आयटीबीटी कार्यालयांमध्ये लाल-पिवळा (कन्नड) ध्वज अनिवार्यपणे फडकवण्याचे आदेश दिले आहेत.
बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एक नोव्हेंबर हा कर्नाटकसाठी महत्त्वाचा आहे. हा कन्नड राज्योत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. बंगळुर विकास मंत्री म्हणून मी सर्व कंपन्या आणि शैक्षणिक केंद्रांना कन्नड (लाल-पीवळा) ध्वज फडकवण्याचे आदेश देत आहे. बंगळुरमध्ये ५० टक्के परदेशी आहेत. १ नोव्हेंबरला कर्नाटक ध्वज सक्तीने फडकावा, १ नोव्हेंबर हा उत्सव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र त्या दिवशी सर्व संस्था आणि कंपन्यांनी कन्नड ध्वज फडकवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
बंगळूर जिल्ह्यात ५० टक्के लोक बाहेरचे आहेत. बाहेरून आलेल्यांनीही कन्नड शिकावे. सांस्कृतिक कार्यक्रम सक्तीचे केले पाहिजेत. कन्नड ध्वजाला राष्ट्रध्वजाप्रमाणे मान दिला पाहिजे. ध्वजारोहण करून राज्य भक्ती दाखवली पाहिजे, असे ते म्हणाले.
कन्नड संघटनानी धमकावू नये
बंगळुरमध्ये प्रत्येकजण राज्योत्सव साजरा करतो. कोणत्याही कन्नड संघटनेने राज्योत्सव सोहळ्यावर दबाव आणू नये. शासनाने तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार राजोत्सव साजरा केला जातो. नियम न पाळणाऱ्या संस्थेवर काय कारवाई करायची याचा निर्णय सरकार घेईल. कन्नड संघटनांनी खासगी संस्थांकडे जाऊन आवाज करू नका, धमकावू नका, असे सांगितले.
कोरोना प्रकरणाच्या चौकशीसाठी माझ्या नेतृत्वाखाली एक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. सणानंतर मी याबद्दल बोलेन. केंद्र सरकारच्या कर वितरणातील भेदभावाबाबतही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.