Tuesday , December 3 2024
Breaking News

बक्कापाची वारी विकण्यासाठी पुढाकार घेतलेल्या दलालांनी आजच्या बैठकीला उपस्थित रहावे; अन्यथा घरासमोर निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : बक्कापाची वारी विकण्यासाठी जे दलाल पुढे आलेले त्यांनी शेतकऱ्यांच्या नावे करायचे पैसे जमा न केल्यामुळे गावामध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भव्य अशी निषेध फेरी घेण्यात आली. यामध्ये गावातील हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. त्याचबरोबर वारी विकणाऱ्या दलालांना खादरवाडीच्या शेतकऱ्यानी चांगलाच इशारा दिलेला आहे. त्यांनी आज सोमवार रात्री ठीक आठ वाजता ब्रह्मलिंग मंदिरमध्ये बैठकीला यावे जर ते आले नाहीत तर पुढील निदर्शने ही त्यांच्या घरासमोर करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर हा बक्कपावारी विषयी लढा हा गेली दोन वर्षे चालू आहे तरी या दलालाना दहा दिवस वेळ दिलेला होता की तुमचे म्हणणे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याकडे, गावातील कोणत्याही शेतकऱ्याकडे किंवा प्रतिष्ठित नागरिकाकडे आपले म्हणणे मांडावे असे गावभर दवंडी देऊन त्यांना सांगण्यात आले होते. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे खादरवाडी गावातील शेतकरी व नागरिक दलालाच्या विरोध घोषणाबाजी केली आणि आज जर ब्रह्मलिंग मंदिरमध्ये आला नाही तर संपूर्ण गावासमवेत 18 दलालांच्या घरासमोर निदर्शने करून त्या गल्लीत भीक मागून स्वयंपाक करून जेवण बनवून खाण्यात येईल, असा इशारा गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सन्मित्रच्या खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love  बेळगाव : येळ्ळूर येथील सन्मित्र फौंडेशन आयोजित जिल्हास्तरीय मुलामुलींच्या खो-खो स्पर्धा रविवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *