Sunday , September 20 2026
Breaking News

भाजप ग्रामीण कार्यकर्ता मेळावा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच तयारीला लागावे. तसेच केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले.
सोमवारी धर्मनाथ भवन येथील भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गुळेदगुड मतदारसंघाचे माजी आमदार राजशेखर शिलवंत, प्रधान सचिव मल्लिकार्जुन मादमनावर, संदीप देशपांडे, राज्य महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत, भाजप ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकर्ते लक्ष्मण तापसी व्यासपीठावर होते.

अधिकाधिक महिला कार्यकर्त्यांना भाजपा पक्ष संघटनेशी जोडावे, असे आवाहन महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले.

यावेळी माजी आमदार राजशेखर शिलवंत यांचा सत्कार करण्यात आला. युवराज जाधव, के. व्ही. पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *