खानापूर : खानापुरात अवैधरित्या वाळूची तस्करी वाढली असून या व्यवसायासाठी विजेचीही बेकायदेशी वापर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. याकडे हेस्कॉमसह प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी डोळेझाक करत असल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
खानापूर नदी पात्रातील, वनक्षेत्रातील, सर्व्हे क्रमांक जमिनीतील वाळूची तस्करी जोरात सुरु असून बेकायदेशीरपणे वीज देखील वापरली जात असल्याचे निदर्शनात आले आहे. बेळगावच्या खाण आणि भूविज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनि, तसेच हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी देखील याकडे डोळेझाक केल्याची तक्रार होत आहे. बेकायदेशीर वाळू व्यवसाय व वीज चोरीला आळा घालून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.