गडहिंग्लज : गडहिंग्लज अनिसच्या कार्यकर्त्यांनी शांताबाईच्या मनातील भीती व अंधश्रद्धेची जळमटे दूर केल्यावर दहा वर्षे सोसलेल्या भल्या मोठ्या जटेचा भार उतरवला आणि 75 वर्षाच्या या आजीबाई अखेर जटामुक्त झाल्या.
मांगनूर दड्डी येथील श्रीमती शांताबाई या हसुर सासगिरी येथे आपल्या सुमन शिवाजी मांगले या मुलीकडे सध्या राहायला आहेत. यापूर्वी या गावातील शांताबाई श्रीपती यादव यांना अनिसने जटामुक्त केले होते. ज्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली येथे सत्कार झाला होता. त्यामुळे या शांताबाई भुईबर आजीचे त्यानेही परिवर्तन केले. मी जटामुक्त झाल्यापासून मला कशाचाही त्रास झाला नाही हा विश्वास यादव यांनी दिल्यामुळे भुइंबर आजींची मानसिकता बदलली आणि अनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे व प्रा. सुभाष कोरे यांनी त्यांचे प्रबोधन केले आणि मतदानाला पाठवले. शांताबाई श्रीपती यादव, शोभा चंद्रकांत नावलगी, संगीता संतोष महाले, कोंडुबाई बाळासाहेब पोवार, सुमन शिवाजी मांगले आणि कार्यकर्त्या प्रा. अश्विनी पाटील, इंजिनियर प्रज्ञा भोईटे इत्यादी उपस्थित होते.