बेळगाव : सुवर्णसौध बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइन्सतर्फे 9 ते 19 डिसेंबर दरम्यान बेंगळुरू ते बेळगाव दरम्यान विशेष विमानसेवा A320 उड्डाण सुरू करण्यात येणार आहे.
सदर विमान बेंगळुरूहून सकाळी 6 वाजता निघेल आणि 7 वाजता बेळगावला पोहोचेल. पुन्हा बेळगावहून सकाळी 7:30 वाजता निघेल आणि सकाळी 8:30 वाजता बेंगळुरूला पोहोचेल. या विशेष विमानात 189 जागा आहेत.
बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, एटीआर 72 विमानसेवा 20 डिसेंबरपासून नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.