Wednesday , December 18 2024
Breaking News

महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्र्यांची यादी

Spread the love

 

मुंबई : महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. नागपुरातील राजभवनात हा शपथविधी आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. त्यामुळे सध्या नागपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यापूर्वी काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.

येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. सध्या कोणत्या पक्षातील किती आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
उदय सामंत
दादा भुसे
शंभूराज देसाई
संजय शिरसाट
भरत गोगावले
अर्जुन खोतकर
प्रताप सरनाईक
प्रकाश आबिटकर
विजय शिवतारे

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
अतुल भातखळकर
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रशेखर बावनकुळे
संजय कुटे
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
अतुल सावे

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
छगन भुजबळ
आदिती तटकरे
अनिल पाटील
संजय बनसोडे
अजित पवार
मकरंद पाटील
नरहरी झिरवाळ
धनंजय मुंडे
सना मलिक
इंद्रनील नाईक

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची कोंडी उद्या फुटणार?

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *